पुणे : आजही संध्याकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र संध्याकाळी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागात सुमारे अर्धा ते एक तास पाऊस कोसळला. या पावसामुळे नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोमवारपासूनच गुडघ्याच्या वर  पाणी साचले आहे. आजच्या पावसाने इथली परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. कारखाने तसंच इमारती पाण्यानं वेढल्यात. परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात  पावसाची संततधार कायम आहे. काल रात्री पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाचा जोर वाढल्यानंतर शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरातील अनेक नागरी वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. सप्टेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. यात जीवितहानीबरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस कोसळत आहे. 



पावसाचा जोर वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. येरवडा शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी आझादनगर , बी.टी. कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड या भागातील सोसायटी आणि वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरले होते, अशी माहिती देण्यात आली होती.