Mumbai Pune Expressway Traffic Jam : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरु आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबई लेनवरील वाहतूक थांबवून पुण्याकडे जाणारी वाहतूक मुंबई लेनवरुन सुरु करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेसने प्रवास करताना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. उद्या  विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहन रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.


 मुंबईकडून  पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे बोरघाटात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे वाहने अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत असतात. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा याआधीही दिसल्या आहेत. या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी  खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधूनमधून दहा मिनिटांचा ब्लॉक घेवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरुन सोडण्यात आली आहेत आहे.


आज सुट्टी असल्याने आणि उद्यापासून वीकेंड सुरु होत आहे. त्यामुळे लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. तर काही जण सुट्टीमुळे गावी जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे सुट्टी आणि त्यात वीकेंडने महामार्गावर जास्तीची वाहने दिसून येत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यामुळे वाहतूक  कोंडी दिसून आली. आज सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उतरल्याने मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी दिसून आली.