पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा (helmet is mandatory) निर्णय़ घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector of Pune) आज आदेश काढले आहेत. बाईक चालवणाऱ्यांचे (Bike Riders) सर्वाधिक अपघात होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ( helmet is mandatory for Government employees and Students in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. 1 तारखेपासून हे आदेश लागू होणार आहेत. कारच्या तुलनेत बाईक चालकांचा अपघातात डोक्याला मार मागून मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


सर्व सरकारी अधिकारी (Government officer) आणि कर्मचारी यांना कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट (helme) आवश्यक असणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशारा ही देण्य़ात आला आहे.