रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात. त्यांचा भारतीय तटरक्षक दलात समावेश करण्यात आलाय. अलिबाग तालुक्यातील मांडवा ते बागमांडला या रायगडच्या समुद्र किना-याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस त्या काम करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नौकांची लांबी 27.42 मीटर असून याचं वजन 136 टन आहे. तसंच अरबी समुद्रात ताशी ४५ नॉटीकल्स माईल इतक्या वेगानं चालणा-या या नौका आहेत. नौकांमध्ये 12.7 MMच्या मशीन गन्स आहेत.


त्याचबरोबर इतर शस्त्रांचाही समावेश करण्यात आला असून यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले एकूण 12 क्रूमेम्बर्स सी-433 या नौकेवर आहेत. तटरक्षक दलातील या दोन नौकांमुळे आता रायगडच्या सागरी सुरक्षेमध्ये चांगलीच वाढ झालीय.