नागपूर : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान वाढत चालले आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाहीये. त्यामुळे लोकांना गर्मीतही बाहेर पडता येत नाहीये. त्यात आता वाढत जाणारं तापमान यामुळे लोकं आणखी वैतागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 47.4 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.


नागपूर - 47.0
अकोला - 47.4
अमरावती - 46.0
चंद्रपूर - 46.8
गोंदिया - 45.8
वर्धा - 46.0