पुणे : Raj Thackeray On Hindutva : ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, भोग्यांविरुद्ध लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात, राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार, मातोश्री काय मशिद आहे का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जेल झाली, मग मधू इथे आणि चंद्र तिथे. त्यानंतर लडाखमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य सोबत जेवताना दिसले. हे सर्व ढोंगी आहेत. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. (Raj Thackeray Sabha In Pune)


हिंदूत्व वाॅशिंग पावडर आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधून हजारो परप्रांतियांना हाकलून दिले, कोण माफी मागणार? माफी मागायला गेली 15 वर्षे झोपले होता का? यांना आपलं हिंदूत्व झोंबले, बाकी काही नाही. हनुमानचालिसावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये राडा झाला, त्यानंतर हे लडाखमध्ये एकत्र दिसले. या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे. त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वाॅशिंग पावडर आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.


अनेकांनी माझ्याविरोधात रसद पोहोचवली


माझा अयोध्या दौरा अनेकांना खुपला. त्याच उद्देशातून अनेकांनी माझ्याविरोधात रसद पोहोचवली. पण मी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे आणि रामलल्लाचं दर्शन घेणार आहे, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. पायावरची शस्त्रक्रिया होऊ दे. चार ते पाच आठवडे विश्रांती घेतली की नियोजन आहे. आपला आराखडा तयार आहे. आता जास्त काही बोलत नाही. नंतर यावर बोलणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. मला अयोध्येला येऊ देणार नाही, अशा वल्गना काही जण करत होते. मला अनेकांकडून माहिती मिळत होती. अगदी मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये हा सगळा ट्रॅप होता. आपण या ट्रॅपमध्ये आपण फसायला नको हे माझ्या वेळीच लक्षात आलं. हा सगळा सापळा हे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप  राज ठाकरे यांनी केला. 


राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, यातून चुकीचे पायंडा पडत आहेत, गुजरातमधून कोणाला माफी मागायला लावणार आहात ते सांगा. जर मी हट्टाने गेलो असतो, तर माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते, मग ऐन निवडणुकीवेळी त्या केसेस चालवल्या असता आणि इथे कोणी नसते, हा सर्व ट्रॅप होता, मी जात नाही म्हटल्यावर शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही. शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.