गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्यात अनेक जिल्ह्यात बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळतोय. बीटी तंत्रज्ञान फेल गेल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतक-यांची आर्थिक गणितं विस्कटली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो रुपये खर्चून तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेळ्या कपाशीवर नांगर फिरवण्याची वेळ शासनाच्या गलथान कारभामुळे शेतकर्यां वर आलीये. कपाशीच्या प्रत्येक हिरव्या बोंडात सेंदरी आळीचा प्रादुर्भाव आढळत असल्याने कपाशीच काहीच उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. अधिक उत्पादनासाठी आणि रोग कीड आळया येऊ नये म्हणून बीटी तंत्रज्ञान शासनाने तयार केलं होतं, पण बोंडातच अळी झाल्याने शेतकरी हतबल झालाय.


दहा दहा एकर कापसाची लागवड करून लाखो रुपये खर्च केलेल्या मोठ्या आणि छोट्या शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा फिटत नाहीये. त्यामुळे शेतकरी आता पंचनामे करून शासनाकडून मदतीची अपेक्षा करू लागलेत.


जे बीटी तंत्रज्ञानच कपाशीवर रोग कीड आणि आळयांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तयार करन्यात आल, त्याच बीटी वर प्रत्येक बोंडात आळया निघत असल्याने या सगळ्या स्थितीला नेमक जबाबदार कोण, ज्यांनी कुणी शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडवली त्या सगळ्या दोषींवर कठोर कारवाई करणायची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागलीये.