हिंगोली हादरली! वडिलांचे हातपाय बांधून मुलाचा आईवर अत्याचार; समोर आलं धक्कादायक कारण
Hingoli crime : हिंगोली जिल्ह्यात आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील ही घटना आहे. या घटनेने जिल्ह्याभरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे
गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : एका धक्कादायक घटनेमुळे हिंगोली (Hingoli crime) जिल्हा हादरला आहे. एका निर्दयी मुलाने वडिलांचे हातपाय बांधून जन्मदात्या आईवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या कळमनुरी (Kalmanuri) तालुक्यात घडला आहे. या घटना समजताच अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पीडित आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Hingoli Police) आरोपी मुलाला अटक केली आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. रोजंदारी करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या घरात पती-पत्नी व एक मुलगा असे तिघे जण राहतात. या दाम्पत्याच्या 27 वर्षीय मुलाने त्याच्या आईसोबत नात्याला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. गु्न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी मुलाला दारूचे व्यसण लागले आहे. दारुशिवाय त्याचा दिवसच उजडत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं आहे. आरोपी मुलगा बेरोजगार होता. त्यामुळे मुलगा काम धंदा न करता आई-वडिलांकडे दारूसाठी पैशांसाठी तगादा लावत होता. मात्र या कुटुंबाची परिस्थिती बेताची असून या दारुड्या मुलाचे आई वडील रोजमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे मुलाला दारु पिण्यासाठी रोज पैसे देणे त्यांना शक्य होत नव्हंत.
दारू पिण्यासाठी मुलगा पैसे मागत होता. पण त्या आई वडिलांनी त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही. 20 मे शनिवारी रोजी रात्रीच्या वेळी आरोपी मुलगा दारू पिऊन नशेत घरी आला होता. दारू पिण्यासाठी मला पैसे का दिले नाही म्हणून त्याने वडिलांचे हातपाय बांधून टाकले आणि त्यानंतर त्याने जन्मदात्या आईवर अत्याचार केला.
यानंतर आरोपी मुलाच्या आईने कळमनुरी पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, जमादार प्रशांत शिंदे यांच्या पथकाने मुलाला अटक केली. पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत. या घटनेने आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेलाय.
दारुसाठी विकले आईचे दागिने
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे मद्यपी मुलाने व्यसनपूर्तीसाठी आईचे दागिने चोरले. मुलाबद्दल आईला शंका आल्यानंतर तिने घरातील दागिने तपासल्यावर खरा प्रकार उजेडात आला. आई रेवतीदेवी चंदेल हिने आपला मुलगा राकेश विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत पळून जाणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील राकेश चंदेल याला यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अटक केली. तपासात जप्त करण्यात आलेले दोन लाखांचे दागिने आई रेवतीदेवी चंदेल यांना सुपूर्द करण्यात आले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या आईला आपल्याच मुलाविरुद्ध तक्रार दाखल करावी लागली.