Akola News :  अकोला महानगरपालिकेतर्फे शहरात नाल्याचे खोदकाम  केले जात होते. यावेळी खोदकामादरम्यान ऐतिहासिक वस्तु आढळल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तात्काळ हे खोदकाम थांबवण्यात आले. या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहे. तत्पूर्वी या वस्तु पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगरपालिकेच्या पश्चिम झोन परिसरातील किल्ला चौक पासून ते पोळा चौक पर्यंत असलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने नाला बांधकाम खोदकाम सुरू आहे. या दरम्यान खोदकाम करताना ऐतिहासिक पुरातन काही वस्तू मिळाल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. खोदकामा दरम्यान लोखंडी पाईप आणि तलवारी दिसून आल्या आहेत. जुने शहर परिसरातील नागरिकांनी हे ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खोदकाम करत असताना काही वस्तू मिळाल्याची माहिती जुने शहर पोलीसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिका वतीने करण्यात येणारे खोदकामास तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. असून या ऐतिहासिक वस्तूची पाहणी महसूल प्रशासन वतीने करण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी या पुरातन ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर ही गर्दी पांगवण्याकरिता जुने शहर पोलीस शर्तीचे प्रयत्न करावे लागले.


रायगडावरील उत्खननात  शिवकालीन वस्‍तू आणि त्‍यांचे अवशेष सापडले


किल्‍ले रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात  शिवकालीन वस्‍तू आणि त्‍यांचे अवशेष सापडले होते . यामध्‍ये शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्याकाळात वापरल्या जाणार्या बंदूकीतील गोळया , तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, त्याकाळातील विटा, कौलै त्याच बरोबर तोफगोळे आणि अन्‍य काही वस्‍तूंचा समावेश होता . किल्‍ले रायगडच्‍या संवर्धनाचे काम सध्‍या सुरु आहे. त्‍यासाठी खासदार संभाजीराजे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली प्राधिकरणाची स्‍थापनाकरण्‍यात आली. पुणे येथील डेक्कन विद्यापिठात पुरातन खात्याचे शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी त्यांच्या पर्यवेक्षकांसोबत गडावर दाखल झाले होते. संपूर्ण गडाची पाहणी केल्यानंतर काही मोजकीच ठिकाणं उत्खननासाठी निवडण्यात आली होती. या उत्खननाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, जगदीश्वर मंदीर आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरदेखील शास्त्रीय पध्दतीने रासायनीक प्रक्रिया सुरू आहे. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या पुरातन वास्तुना धोका निर्माण होऊ शकतो यासाठीची खबरदारी म्हणून ही प्रक्रिया करण्यात येत आहे .