Hiware Bazar richest village in Maharashtra : भारत हा शेती प्रधान देश आहे. पंजाब, हरयाणा, महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेतीच्या व्यवसातून हजारो शेतकरी बक्कळ कमाई करतात. तुम्हाला पाहित आहे का  भारतातील सर्वात जास्त श्रीमंत शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात  भारतातील सर्वात जास्त श्रीमंत शेतकरी राहतात. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्यानावार? भारतातील तिसरा मोठा जमीनदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील  अहमदनगर जिल्ह्यात  हिरवे बाजार नावाचे गाव आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात तब्बल 60 करोडपती लोक राहतात. हे सर्व भारतातील श्रीमंत शेतकरी आहेत.  या गावात सर्वच आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. यातील तब्बल 60 जणांकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हे; दोन नावं ऐकून बसेल धक्का !


खेड्या पाड्यांची प्रगती म्हणेज देशाची प्रगती. असे असताना महाराष्ट्रात अद्याप अनेक खेडी सोई सुविधांपासून वंचित आहेत. हिरवे बाजार गावाने  शेतीच्या जोरावर या गावाने मोठी प्रगती केली आहे. या गावात कोणीही बेरोजगार नाही. कोणाही गाव सोडून दुसरीकडे जात नाही. 


अहमदनगर जिल्ह्यापासून 16 KM अंतरावर हिरवे बाजार हे गाव आहे. या गावची लोकसंख्या 1200 इतकी आहे.  गावचे प्रमुख मानले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे या गावाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला आहे. गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे येथील शेतकरी नेहमीच शेतीत विविध प्रयोग करत असतात. आधुनिक शेतीच्या जोरावर या गावाने मोठी आर्थिक भरभटार केली आहे. या गावात 60 करोडपती लोक राहतात. 50 कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या गावच्या ग्रमस्थांनी लोकसभागातून पाझर तलाव खोदले. 300 पेक्षा जास्त विहीरी बांधल्या. यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 


80 आणि 90 च्या दशकात हे गाव भीषण दुष्काळाच्या छायेत होते. या गावातील लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांनी गाव सोडले. मात्र, गावात राहिलेल्या ग्रामस्थांनी खंबरीपणे परिस्थितीचा सामना केला आणि पोपटराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. सर्वप्रथम श्रमदानातून गावात विहीरी खोदण्यात आल्या. पाण्याच्या प्रश्न सोडवल्यानंतर या गावातील शेतकरी आता अफाट मेहनत घेत शेती व्यवसायातून मोठी कमाई करत आहेत.