कोल्हापूर : हॉकीमध्ये राज्यस्तरीय कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थानींचा बलात्कार करून 3 विदयार्थीनींचे लैगिक शोषण करणाऱ्या नराधम हॉकी शिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर इथल्या कोल्हापूर पब्लीक स्कुलचा हॉकी शिक्षक असून विजय विठ्ठल मनुगडे असे त्याचे नाव आहे. विजयला न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख दंड सुनावला आहे. कोल्हापूरातील देवकर पाणंद इथल्या घरात एका विद्यार्थीनीवर बलात्कार केला होता. तर शाळेमध्येच तीन विद्यार्थिनींचे लैगिंक शोषणही विजयने केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हॉकी खेळाचा निवासी कॅम्पमध्ये हॉकी शिक्षक विजय मनुगडे याचे दुष्कृत्य उघडकीस आले होते. या कॅम्प दरम्यान त्याने 1 विध्यार्थीनीवर बलात्कार तर चौदा वार्षांच्या ३ विध्यार्थीनींसोबत लैगिक चाळे केले होते. अतिशय खालच्या पातळीवर केलेल्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. या चारही मुली हॉकीमधील राज्यस्तरीय खेळाडू आहेत.