मुंबई : राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते. यंदा देखील उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना राज्या सरकारकडून देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


होळी धुळवड निमित्ताने गृह खात्याची नियमावली


  • सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करणे बंधनकारक असेल. रात्री 10 च्या आत होळी करण्यात यावी. 

  • होळी सणाच्या वेळी मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  • होळी साजरा करताना मद्यपान करून विभत्स व उद्धट वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी

  • होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींच कोणीही छेड काढणार नाही.याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असणार आहे.

  • सध्या 10 वी बारावीच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. होळी सणानिमित्त आयोजिक कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर वाजवून परीक्षार्थींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

  • महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.

  • होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देण्यात येऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक बॅनर लावण्यात येऊ नये. 

  • होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  • होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये. 

  • होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये. 



उद्या आणि परवा होणाऱ्या होळी आणि धुलिवंदनाचा उत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या गृह विभागाकडून या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.