हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत चालली आहे. आता घरात जायची पण भीती वाटते ही हाक दिली आहे मंचर ग्रामपंचायत सरपंच दत्ता गांजळे यांनी. दिवसभर मंचर शहरातील लोकांना पाहिजे त्या सुविधा घरपोच देण्यासाठी प्रशासनाबरोबर अनेक लोकांच्या संपर्कात जावे लागते. त्यामुळे गावाबरोबर कुटुंबाची काळजी वाटते. म्हणून सरपंच दत्ता गांजळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच आपलं घर बनवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन केला आणि मंचर ग्रामपंचायतीने स्थानिक किराणा, भाजीपाला दुकानदारंच्या सोबतीने संपूर्ण मंचर शहरात सर्व सुविधा घरपोच देण्याची योजना आखली आणि यशस्वी झाली. त्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने ग्रामपंचायतची जबाबदारी वाढली असून संपूर्ण शहरात कुणालाही कसली अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा देऊन मंचर ग्रामपंचायत लढत आहे.


मंचर शहराची जबाबदारी सरपंच दत्ता गांजळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते दिवसभर लोकांच्या समस्या सोडवत असताना कोरोनाचा संसर्ग आपल्यात घरापर्यत जाऊ नये. यासाठी या सरपंचानी आपला मुक्काम थेट ग्रामपंचायतमध्ये ठेवला आहे. सरपंचांच्या या कामाचे मंचरकर मात्र कौतुक करत आहेत.