पुणे : महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांचा निवृत्ती समारंभ पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या सभारंभाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात प्राचार्य गायकवाड यांनी राज्यात गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री या कार्यक्रमाला आले असे म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचा दाखला देत गृहमंत्री वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात राज्यात कसलीही परिस्थिती गंभीर नाही. सर्व ठीक आहे. काही जण परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती व्यवस्थित असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राणा दाम्पत्य हा काही आंतरराष्ट्रीय प्रश्न नसल्याच सांगत त्यावर बोलणे टाळले. आर्यन खान याला एनसीबीने क्लीन चीट दिली. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. 


यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, समीर वानखेडे यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले. केंद्राने या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. निर्दोष व्यक्तीला कोणी अडकवत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे. तसेच, त्यांच्यावर कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.