सोशल मीडियावर हनीट्रॅप...ओ बुलाती है...मगर जाने का नही...!
आता सोशल मीडियावर अॅक्टीव असणाऱ्या तरुण आणि पुरुष मंडळींना सावध करणारी बातमी.. कारण सोशल मीडियावर
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : आता सोशल मीडियावर अॅक्टीव असणाऱ्या तरुण आणि पुरुष मंडळींना सावध करणारी बातमी.. कारण सोशल मीडियावर हनी ट्रॅप वापरुन तुम्हाला सावज बनवण्याची संधी हेरली जातेय. जर तुम्ही या हनी ट्रॅपमध्ये अडकला तर तुमचा खिसा आणि इज्जत दोन्ही धोक्यात येऊ शकते.. आम्ही असं का म्हणतोय, बघा नगरमधलं उदाहरण...
सोशल मिडीयावर अनोळखी महिलेशी मैत्री करताय? अनोळखी महिलेशी चॅटिंग करताय? तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताय?
सावधान ! हा व्हिडिओ कॉल तुम्हाला बरबाद करु शकतो. कारण ऑनलाईन फसवणुकीसाठी आता महिलांचा वापर करुन हनी ट्रॅप वापरला जातोय. उत्तर भारतातल्या टोळ्या राज्यातल्या पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळताहेत. अहमदनगरच्या सायबर शाखेत 15 दिवसात अशा 2 तक्रारी आल्यात. महत्त्वाचे म्हणजे या हनिट्रॅपमध्ये अडकलेले दोघेही उच्चशिक्षित आहेत.
हनी ट्रॅपमध्ये सुरुवातीला सोशल मीडियावर सुंदर तरुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते.. ती स्वीकारल्यावर सुरु होतं चॅटींग, प्रेमळ चॅटिंगनंतर सुरू होतो व्हिडिओ कॉल... पण हा व्हिडिओ कॉल तिच्याकडून रेकॉर्ड केला जातो आणि नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते.
उत्तर भारतातल्या अनेक टोळ्या यात सक्रीय आहेत. सुरुवातीला अनोळखी सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, मग तरुणीशी मेत्री केल्यावर ती चॅटींग सुरू करते. जवळीक वाढल्यावर व्हिडिओ कॉल, हाच व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो.सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी होते.
मोबाईलमुळं अवघं जग मुठीत आलं. पण तुमच्या मुठीतला पैसा मिळवण्यासाठी याच मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर हनी ट्रॅपवाल्या टोळ्या करताहेत. तेव्हा इथून पुढे कुठल्या अनोळखी सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली की समजून जा... हा हनी ट्रॅप तुम्हाला गोत्यात आणणार आहे.