Dhule Accident News: छत्रपती संभाजीनगर येथील अपघाताची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीचा अपघात झाला असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या चक्काचुर झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. त्यादरम्यान भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दीपक असं या पिकअप वाहन चालकाचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर हिरे येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


संभाजीनगर येथेही भीषण अपघात


संभाजीनगर येथे 14 सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा आणि मृत्यू झाला होता. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबेजळगाव येथे हा अपघात झाला