Crime news: पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला आहे. शासकीय वसतिगृहेदेखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिखली तालुक्यातील पेठ येथील शासकीय वसतिगृहात एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वसतिगृह अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यामुळे आरोपी वसतिगृह अधीक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. 


विनायक देशमुख असे आरोपी अधीक्षकाचे नाव आहे. तो पेठ येथील रहिवासी आहे. आरोपीने सतत दोन महिने अत्याचार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत दिलीय. 


याप्रकरणी अमडापूर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला गजाआड केलं. आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 68, 118 (1) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे.


शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग


पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शाळेतील शिपाई यानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे समोर आले आहे. तुषार सरोदे असे या शिपायाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ मोबाईल कॅमेराने रेकॉर्ड केले जायचे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला.  शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा आधीच उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले. शिपाई सरोदे याने चेंजिर रूमच्या एका स्विच बोर्डवर आपला मोबाईल ठेवला. त्यात कॅमेरा सुरु होता. हा सगळा प्रकार विद्यार्थिनींच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ मोबाईलमधून व्हिडीओ डिलीट केले. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितला. यानंतर पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. संतापलेल्या पालकांनी शाळेतील मुख्यधापिकेची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी पालकांसमोर शिपाई सरोदे याला जाब विचारला. पण त्याने आपण असे काही केले नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान शाळेच्या मॅनेजमेंटपर्यंत हा गंभीर प्रकार पोहोचला. त्यांनी केलेल्या चौकशीत आपण हा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच ठेवला होता, अशी कबुली शिपाई सरोदेने दिली. यानंतर शाळेच्या मॅनेजमेंटकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पुणे पोलिसांनी तात्काळ शिपाई सरोदे याला अटक करत गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात पोक्सोसह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.