Ashvini Vashnav on Blanket Washing: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे ट्रेन नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. ट्रेनच्या एसी लोकलमध्ये(AC) मिळणाऱ्या चादर, ब्लँकेट आणि उशांच्या स्वच्छतेवरुन नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. बुधवारी संसेदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे ब्लँकेट आणि बेडशीट किती वेळा धुतात? याचे उत्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अलीकडेच काँग्रेसचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. रेल्वेतील बेंडिगची मुलभूत स्वच्छता कशी केली जाते? रेल्वे महिन्यातून फक्त एकदाच ब्लँकेट धुतले जाते? पण प्रवाशांच्या तिकिटातून या ब्लँकेट धुण्याचे घेतले जातात, असं इंदौरा यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात येणारं ब्लँकेट महिन्यातून फक्त एकदाच धुतलं जातं. त्याचबरोबर त्यांनी हे हेदेखील सांगितले की, बेडरोड कीटमध्ये प्रवाशांना एक अतिरिक्त चादरदेखील दिली जाते. त्याचा वापर ते पांघरुण म्हणून करु शकता. 


रेल्वेमंत्र्यांनी पुढं म्हटलं आहे की, रेल्वेकडून दिले जाणारे ब्लँकेट्स हे हलके आणि सहज धुता येणारे असतात. तसंच, प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभवदेखील मिळतो. स्वच्छ होऊन आलेल्या वस्तुंची गुणवत्ता तपासण्यासाठी व्हाइट मीटरचा उपयोग केला जातो. स्वच्छ बिछाना उपलब्ध करण्यासाठी मॅकेनाईज्ड लॉन्ड्रीचा वापर केला जातो, असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, सुती कपडे धुण्यासाठी मानकीकृत मशिन्स आणि केमिकलचा वापर केला जातो, असंही त्यांनी नमूद केलं आहे. 


अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, रेल्वे प्रवासात काही अडचण असल्यास प्रवासी रेल मदत अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी झोनम मुख्यालयात वॉर रुम स्थापित करण्यात आल्या आहेत. ज्यात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या लिनेन आणि बेडरोलबाबतही तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारींवर लगेचच कारवाई केली जाईल. 


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत म्हटलं की, इंटीग्रल कोट फॅक्टरी (चेन्नई) बीईएमएलसोबत हाय स्पीड ट्रेन सेटचे डिझाइन आणि निर्माण करण्यात येत आहे. या ट्रेनची स्पीड ताशी 280 किमी इतकी आहे. वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर हाय स्पीड ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या ट्रेनसाठी जवळपास 28 कोटींचा निधी खर्च होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.