Property Transfer: मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने नोकरदार व्यक्ती आपली संपत्ती कमावतात. वय झाल्यानंतर स्व कमाईतून कमावलेली किंवा वडिलोपार्जित संपत्ती मुलांच्या नावे करण्याचे ठरवतात. संपत्ती मुलांच्या नावे करण्याआधी एका प्रक्रियेतून जावे लागते आणि काही नियमांचे पालनही करावे लागते. अनेकदा संपत्तीवरुन घराघरात कलह निर्माण झाल्याचेही आपण पाहतो. त्यामुळं पालकांनी याची दक्षता घेऊनच आणि कुटुंबातील सर्वांचा विचार करुनच पालकांनी त्यांच्या संपत्तीबाबत निर्णय घ्यावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांच्या नावे संपत्ती कशी करावी? याचा आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. संपत्ती मुलांच्या नावे करण्यासाठी तीन पर्याय आहेत. या तीन पर्यायांच्या माध्यमातून आई-वडिल त्यांची संपत्ती मुलांना देऊ शकतात. मात्र, संपत्ती नावे करताना काय काळजी घ्यावी हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


नॉमिनेशन


जर आई- वडिलांना मुलांच्या नावे संपत्ती करायची असेल तर नॉमिनेशन हा पर्याय वापरु शकतात. हा पर्याय वापरून आई-वडिल मुलांमध्ये त्यांची मालमत्ता विभागून देऊ शकतात. नॉमिनेशन करुन संपत्ती मुलांच्या नावे होऊ शकते. त्याचबरोबर आई-वडिलांनी त्यात आणखी एकाचे नाव जोडायचे असल्यास ते नॉमिनेशनमध्ये बदल करुन दुसरं नावही जोडू शकतात. 


मृत्यूपत्र


नॉमिनेशन व्यतिरिक्त मृत्यूपत्र किंवा इच्छपत्र हा दुसरा पर्यायही उपलब्ध आहे. पालकांची इच्छा यामध्ये नमूद केलेली असते. तुमची संपत्ती तुम्हाला कोणाच्या नावावर करायची आहे. तसंच, संपत्तीत किती वाटेकरी असतील, हे सर्व तपशीलवार तुम्ही मृत्यूपत्रात नमूद करु शकता. मृत्यूपत्र हे कायदेशीरित्या वैध दस्तावेज आहे. मृत्युपत्राद्वारे तुम्ही तुमची संपत्ती तुमच्या मृत्यूनंतर कोणत्याही संबंधित व्यक्तीला सुपूर्द करू शकता. जर तुम्ही अल्पवयीन नसाल आणि तुमची मानसिकता असेल, तर तुम्ही भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 नुसार तुमची इच्छापत्र लिहू शकता. मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण कायदेशीररित्या वैध मानले जाते.


गिफ्ट डिड


स्वतःच्या मालकीची आणि अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिसपत्राने (गिफ्ट डीडने) ट्रान्स्फर करता येते. बक्षिसपत्र (Gift Deed) लिहून देणाऱ्या व्यक्तीस ‘डोनर’ (दाता), तर ज्याच्या लाभात ते लिहून दिले जाते, त्या व्यक्तीस ‘डोनी’ (लाभार्थी) असे म्हणतात


काय काळजी घ्याल


पालकांनी जी काही संपत्ती व मालमत्ता हस्तांतरित करायची आहे त्याची दस्तावेज करुन घ्या. तसंच, कागदपत्रे करुन घेणे आवश्यक आहे.  कागदपत्राच्या मदतीने वाद टाळण्यास मदत होते. यासोबतच तुमची मालमत्ता काय आहे हे कागदपत्रांद्वारे पडताळण्यातही मदत होते.