HSC Exam 2023 Paper Leak:  राज्यात बारावीची परीक्षा (HSC Exam 2023) सुरू झाल्यापासून एक-एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. काल (3 मार्च 2023 )  बारावी गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. बुलढाण्यातील सिंधखेडराजा येथे हा प्रकार घडला आहे.  या पूर्वी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता गणिताच्या पेपरात  हा सावळा गोंध चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे या पेपरचं काय होणार? अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावते. मात्र याबात बोर्डाच्या अध्यक्षांनी झी 24 तासला स्पष्टीकरण दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज 


बुलढाण्यातील सिंधखेडराजा येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर गणिताचा पेपर व्हायरल (HSC Exam 2023 Paper Leak) झाला होता.गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हा पेपर कोणी फोडला? यामागे कोणाचा हात आहे? याची तपासणी केली जात आहे.परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला, याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी झी 24 तास ला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


याचपार्श्वभूमीवर शदर गोसावी यांना गणिताच्या पेपरचं काय होणार असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर प्रतिक्रिया देताना गोसावी म्हणाले की, विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता वर्गात गेले होते. त्यानंतर 12.30 वाजता पेपर फुटीची माहिती मिळाली. त्याआधी पेपर किती वाजता व्हायरल झाला? का झाला? कुठून झाला? याची चौकोशी केली जाणार त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच सकाळी 10.30 वाजेपर्यंत ते  दुपारी 2.30 वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी स्पष्ट केले आहे.