HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. (HSC Exam ) बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. (HSC Exam News in Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीच्या 50 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. अशीच हीच स्थिती कायम राहिल्यास बारावीच्या निकालास विलंब होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीची माहिती न मिळाल्यानं शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. गेल्या 7 दिवसांत झालेल्या पेपरच्या जवळपास 50 लाख उत्तरपत्रिका महाविद्यालय आणि कस्टडी स्तरावर तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. 


दरम्यान, 12 वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. (HSC Board Exams ).  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला मिळत आहे.  प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आल्या. बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तर छापून आले होते.


प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. तसेच हिंदीच्या प्रश्न पत्रिकेतही काही त्रुटी दिसून आल्यात. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना इंग्रजी भाषेतील प्रश्न पत्रिका देण्यात आली होती. हा प्रकार बीडमध्ये समोर आला.  शेवटी इंग्रजी भाषेतील प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या प्रकारामुळे बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.