पुणे : आज एचएससीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ८९.९० टक्के मुलांनी या परीक्षेत बाजी मारलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निकालात पुन्हा एकदा कोकणची मुलं अव्वल आल्याचं दिसतंय. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९५.२० टक्के लागलाय. तर मुंबईचा निकाल मात्र सर्वात कमी म्हणजेच ८८.२१ टक्के लागलाय.


शाखेनुसार निकाल :


विज्ञान शाखेचा निकाल - ९५.८५ टक्के


कला शाखेचा निकाल - ८१.९१ टक्के


वाणिज्य शाखेचा निकाल - ९०.५७ टक्के


जिल्ह्यानुसार आकडेवारी...


कोकण - ९५.२० टक्के


कोल्हापूर - ९१.४० टक्के


पुणे - ९१.१६ टक्के


औरंगाबाद - ८९.८३ टक्के


अमरावती - ८९.१२ टक्के


नागपूर - ८९.०५ टक्के


नाशिक - ८८.२२ टक्के


लातूर - ८८.२२  टक्के


मुंबई - ८८.२१ टक्के


उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल चांगला लागलाय, असं म्हणावे लागेल.


२०१२ - ७४.४६ टक्के


२०१३ - ७९.९५ टक्के


२०१४ - ९०.०३ टक्के


२०१५ - ९१.२६ टक्के


२०१६ - ८६.६० टक्के


२०१७ - ८९.९० टक्के


हा निकाल पाहण्यासाठी महारिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन (http://mahresult.nic.in/) या वेबसाईटवर क्लिक करा.