नागपूर  : नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयाचा दृष्टीबाधीत विद्यार्थी हृषिकेश आढाव याने कला शाखेत तब्बल ८४.३८ टक्के गुण मिळवलेत. बुलडाणा जिल्ह्यातील उबारखेडा या लहानश्या गावातल्या हृषिकेशच्या झोळीत नियतीने अंधत्व टाकलं पण कठोर मेहनत आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं. हृषीकेशचे वडील शेतमजुरीचं काम करतात. हृषिकेशने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले.  


हृषिकेशची घरची परिस्थितीही अतिशय बेताची आहे. थोडी शेती व शेतमजूर वडील काम करतात... हृषिकेशने मिळवलेल्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना  वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रू रोखू शकले नाहीत. आपल्या कष्टाचं चीज झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. उल्लेखनीय म्हणजे, दहावितही ऋषिकेशनं ८० टक्के मिळवले होते.