12th Student Retake Exam: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलाय. 
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत,  त्या कोणीही नाराज होऊ नये. त्यांच्यासाठी परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले. 


बारावीत शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या तनिशाने सांगितलं यशाचं गुपितं 


दहावीचा निकाल 27 जूनला लागू शकतो. 24 तारखेपासून प्रवेश सुरू होतील, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जी मुलं 12 वीत पास झाले परंतु ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत. ती मूलही पुन्हा 12 वीच्या परीक्षेत बसू शकणार आहेत.


निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे 


कोकण 97.51 %
लातूर  92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %


पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज? 


सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा  घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.