दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया : बारावीच्या ८० लाख तपासलेल्या उत्तर पत्रिका पडून राहिल्यायत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन न पाळल्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्यायत. मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश निघेपर्यंत बोर्डात उत्तरपत्रिका आणि मार्कशीट जमा करणार नाही, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ मार्च रोजी शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची बैठक झाली त्यात तीन मागण्या मान्य करून दोन दिवसांत आदेश काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. पण आठ दिवस झाले तरीही आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे.