जळगाव : बंद पडलेल्या हाफकीन कंपनी प्रशासनाचे एकेक किस्से समोर येताय. जळगावच्या हाफकीन कंपनीमधून गेल्या काही वर्षांत निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागेवर एकाही नव्या कर्मचा-याची नियुक्ती झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेका अधिकारी, कर्मचाऱ्याकडून तीन ते चार विभागांची जबादारी सांभाळली जातेय. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या हाफकीन कंपनीच्या कारभाराकडे वरिष्ठांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतोय.


हाफकीन कंपनीतील उत्पादन बंद असल्याने गेल्या २१ जुलैपासून कंपनीचे वीज कनेक्शन देखील कापण्यात आलंय. त्यामुळे कंपनीला विजेचे दरमहा ८० ते ९० हजार रुपये बिल फुकट भरावं लागतंय. याबाबत कर्मचारी युनियनने प्रशासनाकडे तक्रार केली असतांनाही काहीच कार्यवाही झाली नसल्याचं सांगण्यात आलं. 


तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी हाफकीनबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्याकडे बोट दाखवलंय. त्यामुळं हाफकीनचं पुनरूज्जीवन होणार की नाही अशी शंका आहे.