राज ठाकरे यांच्या सभेसाठी असा असणार चोख पोलीस बंदोबस्त
Raj Thackeray Sabha | राज ठाकरे यांच्या सभेला काही तास उरले आहेत.
औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये होत असलेल्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. सभेआधी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभा उधळून देण्याचा इशारा काही संघटनांनी दिल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.
1 पोलीस आयुक्त
8 पोलीस उपायुक्त
12 सहायक आयुक्त
52 पोलीस निरीक्षक
156 एपीआय, पीएसआय
2 हजार पोलीसकर्मचारी
600 एसआरपीएफ कर्मचारी
सभेआधी पोलिसांनी डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, मेटल डिटेक्टर पथक यांद्वारे कसून मैदानाची तपासणी केली. मनसेच्या या सभेला अगदी काही तास उरले आहेत. सभेचं काऊंटडाऊन सुरू झालंय त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) दाखल झालेत. राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं.