Nashik News: मुंबई ते नाशिक (Mumbai To Nashik) रेल्वे मार्गावर खर्डी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाशिकच्या चाकरमान्यांची पंचवटी एक्सप्रेस त्यामुळे थांबल्याने नाशिकचे शेकडो प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू झालेल्या पहिल्याच पावसात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्याने रेल्वे मार्गावर झालेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. त्यामुळे प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केलाय. (Latest Marathi News)


नाशकात कुठं कुठं पाऊस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain Update) सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह काही तालुक्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बागलाण, नांदगाव, येवला तालुक्यांत पावसाने दडी मारली असली तरी कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे.


मुंबईत ये जा करणारे अनेकजण पंचवटी एक्स्प्रेसने (Panchavati Express) प्रवास करतात. मात्र, पावसाळ्यात अनेकदा या मार्गावर दरड कोसळल्याची किंवा माती रुळावर आल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर येत असते. अशातच यंदाच्या पावसाळ्यात देखील हीच परिस्थिती असणार असल्याचं चित्र समोर येतंय.  (Latest Marathi News)


आणखी वाचा - Maharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील 'या' भागांना IMD कडून अलर्ट जारी!


दरम्यान, घाटमाथा क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  रोहिणी आणि मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. यंदाचा पाऊस बळीराजासाठी सुखद ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.