वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बातमी आहे महाराष्ट्राला सुन्न करणारी. कोरोनात नवरा गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नसल्याने हतबल झालेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
अंमळनेरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर कोरोना काळात संकट ओढावलं. कुटुंबातला कमावता व्यक्ती गेला आणि संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडलं. पदरात सात मुलं आणि आर्थिक परिस्थिती बिकट असं दुहेरी संकट या महिलेवर ओढावलं. पती गेल्याचं दु:ख कमी की काय सात मुलांचं पोट भरणार कसं ही चिंताही तिला सतावत होती.


अखेर नाईलाजास्तवर या महिलेने आपलं अडीच वर्षांचं बाळ एका व्यक्तीला अवघ्या दीड हजारात विकलं. लहान बाळाच्या विक्रीची माहिती अमळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसही हळहळले. 


पोलिसांनी त्या व्यक्तीकडून बाळ परत घेतलं आणि त्या बाळासह इतर सहा भावंडांना बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केलं.