Mumbai News Today:  स्वतःचे घर नसल्याने आणि भाड्याने घर घेण्याइतकी रक्कम नसल्याने पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण आणि धमकी यासारख्या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे. तसंच, पुढील प्रकरण अधिक तपासांसाठी पंतनदर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलं. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. 


प्रकरण काय?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतनगर येथे राहणाऱ्या तरुणाला नोकरी नव्हती त्यामुळं त्याची आर्थिक स्थिती कमकुवत होती. पाच वर्षांपूर्वी त्याचा सांगलीयेथील एका तरुणीशी लग्न झाले होते. त्याला दोन मुलीदेखील आहेत. मात्र, मुंबईत राहण्यासाठी जागा नसल्याने त्या सांगलीतच राहत होत्या. घर भाड्याने घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यातच पत्नीदेखील दोन मुलींना घेऊन मागील आठवड्यात मुंबईत आली होती. 


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 आणि 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री आरोपी पत्नीला घेऊन घाटकोपर येथील एका शाळेमागे तिला घेऊन गेला. तिथे तिला मित्रासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर. दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपी तिला एका सुनसान व भग्न इमारतीत घेऊन गेला व तिथे दोन मित्रांसोबत तिची ओळख करुन दिली. 


पीडितेचा आरोप आहे की, पतीने तिचे तोंड बंद केले आणि हात बांधून ठेवले त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर पतीने तिला सांगितले की, दोन्ही मित्र मला भाड्याचे घर घेऊन देणार आहेत तसंच, भाडे भरण्यासाठी मदतदेखील देणार आहेत. तुला त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवावेच लागतील. दोन्ही आरोपी हे पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. तसंच, दोघांनी त्याला 10 हजार रुपये दिले होते. 


पतीच्या या अमानुष वागण्यामुळं संतापलेली पत्नी मुलींना घेऊन लगेचच माहेरी सांगलीला गेली. तिथे तिने तिच्या घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या घरचे तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले व तक्रार नोंदवली. त्यानंतर सांगली पोलिसांनी गा गुन्हा पंतनगर पोलिस ठाण्यात वर्ग केला. पोलीसांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच कारवाई करत दोन मित्रांना अटक केली.