बीड : खळबळजनक बातमी बीडमधून. (Beed) मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण ( husband beat the wife) करत रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू ( wife died) झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला डांबूने रात्रभर बेदम मारहाण केल्याने अती रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगपूर शिवारात घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.  (The husband beat the wife, the wife died)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही. पुन्हा मूल होण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार, या संतापातून पतीने पत्नीला जबर मारहाण केली आणि तिला रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये अधिक रक्तस्त्राव झाल्यानं पत्नीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी महादेव रेड्डे याला अटक केली आहे. महादेव आणि राधाला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले होती. मात्र दोन वर्षांपूर्वी आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 



10 वर्षापूर्वी पैठण येथील राधा हिचा विवाह गेवराईत तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य झाले. मात्र दुर्दैवाने मुलाचा आजाराने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल असा तगादा महादेव आपली पत्नी राधा हिच्याकडे लावत होता. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने राधालाही मुलबाळ होणार नव्हते हे तिला माहीत असल्याने ती नवर्‍याला म्हणायची आपण शस्त्रक्रिया पुन्हा करुन घेऊ, असे सांगत होती.


दोघे पती-पत्नी शस्त्रक्रिया करण्यासाठी बीडच्या एका खासगी दवाखान्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासून 30 हजार रूपयाचा खर्च सांगितला होता. 30 हजाराचा खर्च सांगताच महादेवचा पारा चढला अन् तितेच त्याने बायकोला शिवीगाळ करत ऑपरेशन करूनही तुला लेकरू झाले नाही तर मी काय करू? पैसे ही जातेल म्हणून आता मी दुसरं लग्न करतो असे म्हणून तिच्यावर ओरडू लागला. घरी आल्यानंतरही राधाला त्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला. 


दोन-चार दिवसात आम्ही पैसे देतो असे म्हणून तिची समजूत काढली आणि तुझ्या सासरी येवून जावयालाही समजून सांगू असे सांगितले. रात्री मुलाच्या हव्यासापोटी आरोपी महादेव आसाराम रेड्डे याने त्याची पत्नी राधा हिचे हातपाय बांधून रात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत लाकडी दांड्याने मारहाण केली आणि यातच तिचा मृत्यू झाला.