Kalyan Crime News : कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह ड्रम मध्ये भरला. यानंतर हा ड्रम जंगलात नेऊन टाकला. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात खळबळ उडाली आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैनुद्दीन अन्सारी असं हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.  आरोपीला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. आलीमनू अन्सारी असे हत्या झालेल्या महिलेचे नावे आहे. आलीमनुच्या डोक्यात फावड्याचा दांड्याचा प्रहार करून आणि गळा आवळून त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ड्रम मध्ये टाकून तो जंगलात फेकून दिला. 


मैनुद्दीनचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने पत्नी अलीमनूची हत्या केली. पत्नीची हत्या करण्यासाठी मैनुद्दीनने चार दिवस आधीच ड्रम आणून ठेवला आणि दुपाऱ्याच्या सुमारास तिची हत्या केली. आलीमुनूचा घरच्यांना टिटवाळा पोलीस ठाण्यातून मैनुद्दीनने फोन करून हत्या केल्याची माहिती दिल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. मुलीची हत्या करणाऱ्या मैनुद्दीनला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी अलीमनूच्या कुटुंबीयांनी केलीय.


वसईत 8 वर्षाच्या चिमुरडीची हत्या


वसईत 8 वर्षाची मुलगी तीन दिवस बेपत्ता होती. या शाळकरी मुलीचा मृतदेह सोमवारी एका बंद खोलीत आढळून आला आहे. चांदनी साह असे या मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी वसई पूर्वेच्या वाण्याचा पाडा येथे आई वडील आणि भावंडासह रहात होती. तिचे वडील मॅकेनिकचे काम का करतात. चांदनी या परिसरातच जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत शिकत होती. शनिवार 1 डिसेंबर रोजी ती शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून आईस्कीम घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घराजळ खेळत असताना संध्यकाळी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी रात्री उशीरा पेल्हार पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू असताना चांदणीचा मृतदेह आज दुपारी ३ वा च्या सुमारास तिच्या राहत्या परिसरातील एका चाळीतील बंद खोलीत आढळला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पेल्हार पोलीस तसेच गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेत आहेत.