मोबाईल चेक केला म्हणून पतीची पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
आपल्या पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना नाशिकजवळ अंबड येथे घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा सर्व स्तरातून टीका होत आहे.
नाशिक : आपल्या पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना नाशिकजवळ अंबड येथे घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा सर्व स्तरातून टीका होत आहे.
सोशल मीडिया आणि मोबाईलचा अती वापर यामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रकार वाढत आहे. त्यातीलच हा प्रकार असल्याचा प्रत्यय आला आहे.
पतीचा मोबाइल पहाणे पत्नीला महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंबडमधील दातीरनगर परिसरात शुक्रवारी (दि.२३ मार्च) हा प्रकार घडला. संबंधित महिलेने अबंड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.