राणेंना भाजप संधी देईल असे वाटत नाही - दलवाई
माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे केले.
चिपळूण : माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे केले.
चिपळूणातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार दलवाई यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
तसेच येणा-या तीन ते चार महिन्यांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कोकणामध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं.