Sai Baba : मंगळसूत्र मोडलं, लग्नात आलेले सर्व दागिने साईचरणी अर्पण
साईभक्त महिलेने एकूण 7 लाख रुपयांचा 15.300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंच्या चरणी अर्पण केलाय.
कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : साईबाबांनी (Shirdi Saibaba) आयुष्यभर फकिराचं आयुष्य जगलं. त्यांनी भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा (Sharddha Saburi) मंत्र दिला. साईबाबांचे भक्त फक्त महाराष्ट्रात नाहीत, तर संपूर्ण जगभरात आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी साईबाबांच शिर्डीतील मंदिरात (Shirdi Temple) दर्शन घेतलंय. साईबाबांचे भक्त आपल्या कुवतीनुसार जमेल तितकं दान करतात. अनेक भक्त तर सोन्याचे आभूषणही दान करतात. अशाच एका हैदराबादमधील साईभक्त महिलेने एकूण 7 लाख रुपयांचा 15.300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंच्या चरणी अर्पण केलाय. (hyderabad lady devotee broke his mangulsutra and made jewel and offered sai baba)
आपल्या पतीच्या निधनानंतर हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने एकत्रित केलं. सर्व अलंकार एकत्र करत 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 15. 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंचरणी अर्पण केला आहे. हैद्राबाद येथील साईभक्त श्रीमती पोलावर्णम कल्याणी यांनी शिर्डीला येत साईंच्या चरणी नतमस्तक झाल्या. आपल्या अंगावरील दागिने एकत्रित केले. सोन्याचा हार बनवला. हा सोन्याचा हार साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपुर्त केला.
साईबाबांनी प्रत्येक अडचणीतून मुक्त केलं. कृतार्थतेची भावना साईबाबांच्या चरणी अर्पित व्हावी म्हणून हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पित केला आहे.