जालना / औरंगाबाद : Arjun Khotkar resigned from the post of deputy leader of Shiv Sena : मी शिवसेना उपसेना पदाचा राजीनामा देतोय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेबाना मेसेज केला आहे, असे सांगत अर्जुन खोतकर म्हणाले होय, मी शिवसेना सोडतोय. आणि आता शिंदे गटासोबत जातोय, अशी कबुली शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज जालना येथे दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी अडचणीत आहे , अडचणीत सहारा शोधावा लागतो आणि हा सहारा मी शिंदे गटाकडे शोधला आहे, असे स्पष्टपणे अर्जुन खोतकर यांनी मान्य केले. 40 वर्षांपासून या पक्षासाठी काम करतोय साहजिकच पक्ष सोडताना दुःख आहे. डोळ्यात अश्रू आहेत, मात्र जावं लागत आहे, असं खोतकर म्हणाले.


आज सकाळी उद्धव ठाकरे यांना एक मेसेज केला आणि मी जातोय अशा पद्धतीचे सांगितले, असे अर्जुन खोतकर म्हणाले. पत्रकार परिषदेतही ही घोषणा करताना अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले होते. जालना लोकसभेसाठी मी आग्रही आहे. मी माझं बोललो, अडचण बाबत बाकीच्यांना माहिती नाही. मी सहारा शोधला. बस इतकेच म्हणतो, असे शिवसेना सोडताना खोतकर म्हणाले. 


दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी शिवसेना सोडली. यामुळे फक्त खोतकर नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही दुःख झालं. त्यांची मुलगी, मुलगा, पत्नी आणि त्यांची आई आणि भाऊ सगळेच दुःखी होते. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांची 80 वर्षाची आई तर शिवसेना सोडतोय ऐकून ढसाढसा रडली त्यांच्या कुटुंबीयांसोबत.