कोल्हापूर : मुख्यमंत्रीपद हे माझे स्वप्न नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. राज्यातील जनता तडतफडते, तळमळते, विव्हळते, त्यांच्या आक्रोशाकडे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.


कामं केली नाहीत, तर शेतकऱ्यांपुढे आपण शून्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जनता, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तर मी राजकारणात असलो किंवा नसलो, तरी काहीच फरक पडत नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


मराठीसाठी खमकी भूमिका घेणारा सीएम हवा


मराठी आली पाहिजे, अशी खमकी भूमिका घेणारा मुख्यमंत्री राज्याला अजूनही लाभला नाही, असा मुख्यमंत्री मला राज्याला द्यायचा आहे, असं शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्याची सुरूवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा समाचार


कोल्हापुरातील नेसरीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांना कन्नड भाषा आलीच पाहिजे, असे तिकडचे मुख्यमंत्री सांगतात. पण महाराष्ट्रात राहणाऱ्यांना शिवसेना दुतोंडी नाही. सरकार म्हणून आमच्याकडे अधिकार आहेत, यातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर त्या सत्तेला लाथ मारुन जाणार, असं उद्धव यावेळी म्हणाले.


शेतकरी मल्ल्यासारखे पळत नाहीत


शेतकऱ्याला सरकारचे उपकार नकोत. विजय मल्ल्यासारखी लोकं पळण्यापूर्वीच त्यांना पकडत नाही. पण शेतकऱ्यांने २०- २५ हजार रुपये थकवले तरी त्यांना नोटीस पाठवली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


सरकारवर जाहिरातबाजीची वेळ


जाहिरातबाजीची वेळ सरकारवर यायला नको. जनता ही लाभार्थी नाही, ते आपले दैवत आहे. जनतेचे काम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेले आहे, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला. लोकांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाही, पण सरकारची जाहिरातबाजी सुरु आहे.