मुंबई : आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मराठवाड्यात दौऱ्यावर असताना नारायण राणे मात्र गैरहजर असल्याची चर्चा दिवसभर रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी मराठवाड्यात येत असताना कोकणात मात्र वेगवान हालचाली सुरू असल्याचे दिसून आले. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याचे समजले. मात्र सगळीकडून एकच सवाल विचारला जात होता आणि तो म्हणजे राणेंची अनुपस्थिती. 


यावर राणेंनी उत्तर दिलं आहे की, निमंत्रण नसल्याने मराठवाड्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेलो नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे. तसेच “या कार्यक्रमाला नांदेड, मराठवाड्याचे कार्यकर्ते होते. आजचा कार्यक्रम आमच्या क्षेत्रात नव्हता. मुंबई-पुण्यात कार्यक्रम असता तर गेलो असतो. तिथल्या नेत्यांनी मला आमंत्रित केलं नव्हतं.” शिवाय आजची बैठक पूर्वनियोजित होती. त्यामुळे आपण जाणं गरजेचं नसल्याचं राणेंनी सांगितलं.


गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राणेंच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तेव्हा ही पक्ष प्रवेशासाठी जवळीक आहे का अशी देखील चर्चा रंगली. त्यात आता राहुल गांधींच्या दौऱ्याला राणेंच्या अनुपस्थिती यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.