Vijay Shivtare News :  मंत्री विजय शिवतारे पुन्हा एकदा चर्तेत आले आहेत. शिवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.चौथीत असताना बिड्या पीत होतो असा खुलास शिवतारे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीमुळे विजय शिवतारे चर्चेत आले होते. 


नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणी मी खीप बंडखरो होतो.  चौथीत असताना बिड्या पीत होतो, असा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय. सासवडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना लहानपणीचे किस्से सांगितले. जनावरे चरायला जाताना आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या विकत घ्यायचो. आणि बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो, असं वक्तव्य शिवतारेंनी विद्यार्थ्यांसमोर केलंय... 


विजय शिवतारे यांचा यू र्टन


लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी यू र्टन घेतला. बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल असा शब्द विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाय. अजित दादा आणि आमची दुश्मनी पाहिली होती , आता आमची दोस्ती पाहा असंही विजय शिवतारे म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. 


विजय शिवतारे बॅकफूटवर


अजित पवारांविरोधात दंड थोपटणा-या शिवतारेंनी आपलं पाऊल मागे घेतलंय. विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. यामुळे विजय चर्चेत आले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा झाली.. तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांना तिकीट देण्यात आलंय.  मात्र नणंद भावजयीच्या लढाईत शिवतारेंनी एन्ट्री घेत अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते.. पवारांविरोधात लढण्याची त्यांनी घोषणा केली होती. यानंतर विजय शिवतारे युटर्न घेतला.  शिवतारेंच्या अजित पवारांच्या या लढाईची सुरुवात 2019 च्या निवडणुकीपासून झाली होती.. अजित पवारांनी शिवतारेंना पाडणार म्हणजे पाडणारच अशी गर्जना केली होती.