manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. आता जरांगेंनी दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत १४४ कलम लागू केलं असलं तरी मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलाय. राज्य सरकारनं आधी १८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्यामुळेच आपण २० जानेवारीच्या मोर्चाचं नियोजन केलं. मात्र आता सरकारनं 144 कलमाला मुदतवाढ दिल्यामुळे जरांगेंनी नाराजी व्यक्त केलीय. 


मुंबईत  विविध बंधनं


मुंबईत ९ फेब्रुवारीपर्यंत विविध बंधनं घालण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या दरम्यानच मनोज जरांगे मुंबईत मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या बंधनांवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी टिकात्मक गाणी गाणे, संगीत वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कुणाच्याही प्रतिमा किंवा पुतळ्यांसोबत निदर्शनं करण्यास आळा घालण्यात आलाय. मनोज सारंगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबईतही ही बंधनं लादली आहेत.


ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणा-या मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडलीय. शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीत ही नोंद आढळून आलीय. मोडी लिपी संशोधन करणारं पथक शिरूर दौ-यावर होतं. त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे-पाटील यांचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आलाय. त्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयात हजर होते..तर सर्वांप्रमाणे आपलीही नोंद सापडली मात्र या नोंदीचा लाभ घेणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हंटलंय. सरसकट सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा यासाठी आपली लढाई असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.