अहमदनगर : कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत.  मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.  अहमदनगरची जागा काँग्रेसला  सोडली आणि तिकीट मिळाले तर उत्तम आहे. जर ही जागा नाही मिळाली तरी आपण निवडणूक लढवणार असल्याचे सुजय विखे पाटील यांनी 'झी 24 तास'शी बोलताना स्पष्ट केले आहे. मात्र आपण भाजपमध्ये कदापी जाणार नसल्याचाही खुलासा त्यांनी केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने जी भूमिका ठेवली ती योग्य आहे. जातीवादी पक्षांबरोबर काँग्रेस जाणार नाही. जिल्हा परिषदेची स्थापना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे झालेय. सत्ता स्थापनासाठी काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा घेतलेला नाही. ज्या पक्षाला जनतेने जास्त मते दिली गेली, त्यांनाच सत्ता स्थापन करण्याची संधी हवी. शिवसेनेला जास्त मते मिळालीत. त्यामुळे त्यांना संधी मिळावी, या मताचा मी आहे.


राष्ट्रवादीचे दोन आमदार असले तरी ही विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक लोकसभेची आहे. पक्षापेक्षा उमेदवार याकडे पाहिले पाहिजे. आजपर्यंत राष्ट्रवादी येथे हरला आहे. आज जागा वाटपाबाबत अदलाबदल झाली तर ते चुकीचे नाही. भाजपला रोखायचे आहे. तसेच मी तीन वर्षांपासून मी प्रयत्न करत आहे. हा माझा निर्णय आहे. कुटुंबाने हा घेतलेला निर्णय नाही. त्यामुळे जर तरच्या भूमिकेला महत्व नाही. मी लोकसभा लढविणार आहे. पण मी काँग्रेस सोडणार नाही. पक्षाचे योगदान खूप मोठे आहे. छोट्या कारणासाठी मी काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्टीकरण सुजय यांनी यावेळी दिली.