नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता राधाकृष्ण गमे नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. 9 महिन्यात त्यांची बदली करण्याच आली आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली आता कोठे होणार याबाबत देखील अनेकांना उत्सूकता आहे. कारण ते कोठे ही गेले तरी त्यांचं काम आणि शिस्त ही कधीच बदलत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पीएमपीएमएलचे अध्यक्ष असताना देखील त्यांना राजकीय फटका बसला होता. त्यामुळे त्यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. याआधी देखील नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केला होता. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठराव मंजूर केला होता. नवी मुंबईचे महापौरांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती.


तुकाराम मुंढे सारखे अधिकारी जेथे ही जातात तेथे राजकारणी आणि कर्मचारी देखील त्यांची धास्ती घेतात. त्यामुळे आता तुकाराम मुंढे कोठे जातात. याची उत्सूकता अनेकांना लागली आहे.