Harshvardhan Patil : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटलांनी  केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीच्या वाळवा मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये हर्षवर्धन पाटील यांना बोलवण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  लोकसभा मतदारसंघातून खरंतर धैर्यशील माने हे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीचा अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.


हर्षवर्धन पाटील भाजपात नाराज


 भाजपाचे जेष्ट नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सद्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना आता सोशल मिडियात व्हायरल होणा-या एका पोस्ट ने खत पाणी दिले आहे.  मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीय. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्ट वरती फक्त हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे.  मात्र या पोस्ट मधून कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत. त्याहून पलीकडे ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनीच शेअर केली आहे. त्यावर हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलयं. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभेची अपक्षाची तयारी करताहेत असेही बोललं जात आहे.