नागपूर : नागपुरात कोव्हिड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण  करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहूनच घरी विलगीकरण करता येईल. प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल येथे दाखल करावयाचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून गृह विलगीकरण करता येईल.


वैद्यकीय मदत कधी घ्यावी?


गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा निर्माण हाणे, ऑक्सीजन सॅच्युरेशनमध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.


गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?


 गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरिक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोव्हिड-19 साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.