रायगड : नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प केवळ शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला आहे. जर रायगडमधील जनतेलाही जर हा प्रकल्प नको असेल तर शिवसेना तिथल्या जनतेसोबत राहील, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनंत गिते यांनी दिला आहे. रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या विरोधामुळेच रद्द झाला आहे, असा पुनरउच्चार गिते यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार होता. त्याला नाणारवासियांनी तीव्र विरोध केला. शिवसेना नाणार ग्रामस्थांच्याबरोबर राहिली. त्यामुळे येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हा प्रकल्प कोकणात राहावा, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकल्प रायगडमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली. मात्र, या प्रकल्पाला शेकाप नेते जयंत पाटील यांनी आधीच विरोध केला आहे. हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.


आता रायगडमध्ये हा प्रकल्प होऊ नये म्हणून शिवसेनेने विरोध केला आहे. यावेळी शिवसेनेच्यावतीने आम्ही जतेच्या बाजून असू असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामस्थांना हा प्रकल्प नको असेल तर विरोध करणार असल्याचे मत शिवसेनेचे रायगडचे माजी खासदार आणि माजी मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केले आहे. परंतु अडचणीच्या प्रश्नांवर मात्र, त्यांनी बोलणे टाळत माध्यमांना दोष दिला.