मुंबई/अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. यामुळे बिथरलेल्या काँग्रेसने राज्यात आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात सगळ्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्यावतीनं करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील नरिमन पॉईंट, दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


तर अमरावतीमध्ये भाजप आमदार आणि माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी 'काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही.' असा इशारा दिला आहे.


डॉ. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात बोंडे यांनी हा इशारा दिलाय.


भाजपने माफी मागावी यासाठी काँग्रेस आंदोलन करतय. पण, खरं तर काँग्रेसनेच माफी मागायला हवी. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही. मुख्यमंत्री आले नाही, नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप डॉ. अनिल बोंडे यांनी केला.


काँग्रेसवाले दारु सुरु करतात, कोरोनाकाळात दारुचा टॅक्स कमी करतात. दारुच्या दुकानदाराला लायसन्सची फी कमी करतात आणि कोरोना संपण्याच्या आधीच वाईन किराणा दुकाणात आणतात. माफी यांनी मागायला हवी आणि ते आम्हाला शहाणपणा शिकवतात. आम्ही हे सहन करणार नाही", असा इशाराही त्यांनी दिलाय.