मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलेलं आहे.  काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले सतत पुनरुच्चार करतायेत. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी काँग्रेसला थेट विचारलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसनं एकट्यानं निवडणुका लढवायचं ठरवलं असेल तर तसं स्पष्ट सांगा अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विचारणा केलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यावर पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केलीय. काल शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक झाली. यावेळी पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. 



"स्वबळावर लढायचं हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. 2014 मध्ये काय झालं हे पवार साहेबांना माहीत आहे.  आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा आमचा पक्ष बघेल. काँग्रेस 2024 मध्ये नंबर एकचा पक्ष असेल. महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य असेल. भविष्यात त्याचे रिझल्ट दिसतील", असं नाना पटोले म्हणाले होते.