सांगली : पुन्हा एकदा बेकायदेशीररित्या गर्भपात सुरु असल्याचा प्रकार उघड झालाय. इथल्या चौगुले हॉस्पिटलवर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकलाय. या ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भपात सुरु असल्याच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छाप्यानंतर या ठिकाणी गर्भपात केल्याचे सात केसपेपर आणि औषधं सापडलीत. या प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले, डॉ. स्वप्नील जमदाडे आणि डॉ. विजयकुमार चौगुले यांच्यावर कारवाई होणार आहे. 


या रुग्णालयातून अडीज लाखाची रोकड सुद्धा जप्त करण्यात आलीय. गर्भपात केल्यानंतर राहिलेली औषधं आणि साहित्य हे डॉक्टर हॉस्पिटलच्या मागे जाळून टाकत असल्याचे उघड झालंय.