सांगली : सांगली जिल्ह्यात मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीरपणे जेवणावळीसाठी वापर केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी मिरज वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता पल्लवी साफळे यांना महापालिकेने 10 हजार रुपयांचा दंड बजावला आहे. तशी नोटीस बजावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या नाट्यगृहात बालगंधर्व यांनी कला सादर केली त्याच नाट्यगृहात जेवणावळी घातल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मिरज वैदकीय महाविद्यालयानं कार्यक्रमासाठी नाट्यगृह घेतलं होतं. मात्र, 2 ते 4 जुलै या काळात विनापरवाना जेवणावळी घालण्यात आली. 


या बाबत सामाजिक कार्यकर्ते प्रितेन असर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. दुसरीकडे मिरजेतील शासकीय रुग्णालयात आणि वैदकीय महाविद्यालच्या आवारात जैविक कचऱ्याचे ढिग पडल्यानेही महापालिकेने नोटीस बजावली आहे.