मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Cold Weather: गरमीने कंटाळलेल्या मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांना थंडीने दिलासा दिलाय. राज्यभरात तापमान खाली आले असून गारठा जाणवू लागलाय. त्यामुळे प्रत्येकाने आपले जपून ठेवलेले स्वेटर, कानटोपी पुन्हा बाहेर काढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील जिल्ह्यांमध्ये कसे आहे तापमान? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरण आल्हाददायक असणार आहे. रात्रीप्रमाणे दुपारीदेखील वातावरणात गारवा दिसून येतो. मुंबईसह कोकणातील किमान तापमान 14 तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस राहिल असा अंदाज हवामान खात्याने नोंदवलाय.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 तर दुपारचे कमाल तापमान 26 अंश राहील. पुढचे 2 दिवस म्हणजेच 23 जानेवारीपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक थंडीचा आनंद लुटत आहेत. मुंबईतील तापमान 16.1 अंश सेल्सिअस आहे. तर तुम्ही सुट्टीमध्ये माथेरानला जायचा विचार करत असाल तर तेथील तापमानही जाणून घ्या. माथेरानचे सध्याचे तापमान 14.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
अहमदनगर-12.4
अलिबाग-15.2
छत्रपती संभाजी नगर-12.8
डहाणू -16.5
जळगाव-11.3
कोल्हापूर -16.1
महाबळेश्वर -12.5
मालेगाव-13.6
माथेरान-14.2
मुंबई -16.9
नांदेड -17
नाशिक12.01
धाराशिव 17.2
पालघर-18.6
परभणी -15.8
रत्नागिरी -18.2
सांगली -15.4
सातारा-11.9
सोलापूर-15.2